राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने लसीकरण जनजागृती मोहिमेची सुरवात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने लसीकरण जनजागृती मोहिमेची सुरवात

अहमदपूर ( गोविंद काळे ) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोरोना आपत्ती निवारण समितीच्या वतीने ६ जून रोजी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत शहरात लसीकरण जनजागृती मोहिमेची सुरवात करण्यात आली. येत्या काही दिवसात अहमदपूर तालुक्यातील प्रत्येक गावात या मोहीमेद्वारे संपर्क केला जाईल, लसीविषयी लोकांच्या मनातील असणाऱ्या भिती व गैरसमज यामुळे तालुक्यांतील लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. लसीचे काही डोस वाया जात आहेत. यासाठी जनजागृती गरजेची आहे. आज जरी कोविड चा प्रादुर्भाव कमी असला तरी येणाऱ्या काळात तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. लातूर जिल्हा सध्या अनलॉक झाला आहे.परंतु कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे.लसीकरण जनजागृती या मोहिमे अंतर्गत लोकांमधील शंकेचे निरसन केले जाईल. मास्क, सॅनिटायझर चे महत्व, कोरोना आजाराची लक्षणे व घ्यावयाची खबरदारी याची माहिती देणारे पत्रक व भित्तीपत्रक गावागावात वाटप केले जातील.
या मोहिमेच्या उदघाटनाप्रसंगी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि यासाठी प्रशासनाकडून लागणारी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी कोरोना आपत्ती निवारण समितीचे प्रमुख शिवकुमार हिप्परगे व सहप्रमुख चंद्रशेखर चवंडा, अमित बिलापट्टे , रमेश ढाकणे, केशव भोसले, श्याम बलुतकर, राम रत्नपारखे, संपन्न कुलकर्णी, महेश महाजन, जुगलकिशोर शर्मा, स्वप्निल व्हत्ते, सत्यनारायण गायकवाड, माधव रोंगे, रवी कच्छवे, देविप्रसाद मांडणीकर, अमित गादगे, किरण राठोड, विशाल गोरे, ओमकार गुट्टे, मोनिष कुरील, ओम पळसकर, अक्षय सिंहाते आदींची उपस्थित होती.

About The Author