उज्वल यशासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे, यश हमखास – अँड.किशनराव बेंडकुळे

उज्वल यशासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे, यश हमखास - अँड.किशनराव बेंडकुळे

वैभवशाली योजना राबविण्यासाठी प्राध्यापक व मंडळाची पूर्ण तयारी.

अहमदपूर( गोविंद काळे ) सध्या शिक्षण क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढलेली आहे. या स्पर्धेत उतरण्यासाठी व हमखास यश मिळविण्यासाठी बोर्ड परीक्षा, नीट ,जेई ,एमएचटी ,सीईटी ची संपूर्ण तयारी येथील प्राध्यापक महाविद्यालयातच करून घेणार आहेत.या यशासाठी पालकांचे ही सहकार्य असणे गरजेचे आहे.यामुळे हे उज्वल यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनीही कठोर परिश्रम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ऍड किशनराव बेंडकुळे यांनी केले. ते येथील पालक मेळाव्यात अध्यक्षीय समारोप करतेवेळी बोलत होते.
   यावेळी घेण्यात आलेल्या पालक मेळाव्याचे अध्यक्षस्थानी अँड. किशनराव बेंडकुळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव  अँड.पि.डी. कदम, युवराज पाटील ,ऍड वसंतराव फड , सुरेशराव देशमुख , प्रा. बाळासाहेब जाधव ,मधुकरराव देशमुख, गोविंदराव हिरवे , व्यंकटराव मुंडे, बापूसाहेब कदम ,व्यंकटराव माने ,प्राचार्य कॅ. डॉ. अनिता शिंदे ,प्रा.हेमंत पाटील , प्रा.पी.बी.बाभुळगावकर उपप्राचार्य ,प्रा.जे.पी कुलकर्णी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतेवेळी अॅड.बेंडकुळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपली आवड व क्षमता पाहूनच विषयांची निवड करावी. प्राप्त परिस्थितीचा विचार करून विषय निवडणे आवश्यक आहे. बोर्ड परीक्षा, नीट ,जेईई ,एम एच टी , सीईटी ची संपूर्ण तयारी आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक खूप उत्कृष्ट पद्धतीने व नियोजनाने करून घेणार आहेत. आपणाला ट्युशन लावण्याची गरज अजिबात भासू देणार नसल्याचे यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की आपले यश आपल्या हाती आहे.आपण शिस्तीचे पालन करून अभ्यासाचे सातत्य ठेवावे, नियमित पिरेड करावेत आणि आपली मेहनत, कष्ट खूप महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी शक्यतो मोबाईलचा अनावश्यक मोह टाळावा व आपली काही अडचण असेल तर प्राध्यापक ,पालक, प्राचार्य यांना सांगण्याचे शेवटी आवाहन केले.
यावेळी सचिव ऍड.पी.डी. कदम बोलतेवेळी म्हणाले की आपणाला भविष्याचा वेध हा विचार करून, मन लावून घ्यायचा असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना चांगले ,गुणवान बनवण्यासाठी प्राध्यापकांनी संपूर्ण तयारी केलेली आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करायची तयारी ठेवल्यास आपणास यश निश्चित मिळणार आहे. मंडळांनी गेलेले वैभव परत मिळविण्यासाठी सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण तयारी केल्याचे व आम्ही विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कुठेही कमी पडणार नसल्याचे शेवटी सांगितले.
शैक्षणिक उपक्रम राबवताना प्रशासन कुठेही कमी पडणार नसल्याचे प्राचार्य कॅ.डॉ. अनिता शिंदे यांनी सांगितले.तर वेळापत्रक तयार करून नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास, वाचा अथवा लिहून काढा या त्रीसूत्रीचा उपयोग केल्यास हमखास यश मिळणार असल्याचे प्रा.पी.बी. बाभुळगावकर यांनी सांगितले.
यावेळी प्रा.बि.एस.वलसे,प्रा.एम.बी.रेड्डी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र गुळवे यांनी तर आभार प्रा. विनोद माने यांनी मानले. याप्रसंगी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author