सरसकट शेतकऱ्यांना पिक विमा देण्याची भारतीय जनता पार्टीची मागणी.

सरसकट शेतकऱ्यांना पिक विमा देण्याची भारतीय जनता पार्टीची मागणी.

अहमदपूर ( गोविंद काळे )
अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टी च्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील,माजी आमदार बब्रुवान खंदाडे,जि.प.सद्दस्य अशोक काका केंद्रे यांनी केली आहे.
खरीप हंगाम सन 2022 मध्ये सतत पाऊस होऊन तुर, सोयाबीन, कापूस, मुग, उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामातील कोरडवाहू पिकांचा सर्वे करून अनुदान घोषित केले होते. आगस्ट 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने खंड दिला असल्याने सोयाबीन पिकाची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटली होती त्यानंतर मर, गोगलगाय या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होउन फुलोऱ्यात आलेली तुर उभ्याने जागेवर वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तरीसुद्धा विमा कंपनीने उत्पादनावर आधारित विमा लागू केला नाही. विमा कंपनी बरोबर झालेल्या करारानुसार शेतकऱ्यांना पिक विमा देणे बंधनकारक असतानादेखील जाणीव पुर्वक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिक विमा लागू केला नाही. अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शेतकऱ्यांना सन 2022 खरीप पीक विमा तात्काळ वितरित करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा येईल याची सर्वश्री जवाबदारी कृषी विभाग व प्रशासनावर राहील अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी च्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे यांनी अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालीपाड यांच्या मार्फत कृषी आयुक्त पुणे यांना दिले असून सदरील निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी लातूर, जिल्हा कृषी अधिक्षक लातूर,जिल्हा समन्वयक भारतीय कृषी विमा कंपनी लातूर, भारतीय कृषी विमा कंपनी प्रादेशिक कार्यालय मुंबई, तहसीलदार अहमदपूर व चाकुर यांना देण्यात आले आहे.
यावेळी ज्ञानोबा बडगिरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, माजी तालुका अध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे, अॅड. निखिल कासनाळे,राजकुमार खंदाडे, राहुल शिवपुजे,श्रीकांत भुतडा,नाथराव केंद्रे,माधवराव पाटील,प्रा.दत्ता गलाले,बालाजी पाटील,अविनाश जाधव,भगवान पोले,प्रभाकर चंदेवाड,दत्ता सुरनर, उमाकांत कदम, ज्ञानोबा काळे, व्यंकट मुळे, माधव वाघमारे, हणमंत सारोळे,राम देवकते,पंडित मुंगे,परमेश्वर सोडगिर,अर्जुन सुरनर, सोहेल शेख यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते , अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

About The Author