लिनेस क्लबच्या वतीने बस स्थानकात मोफत रोपटी व कुंडी वाटप

लिनेस क्लबच्या वतीने बस स्थानकात मोफत रोपटी व कुंडी वाटप
   अहमदपूर ( गोविंद काळे): येथील क्लबच्या वतीने बस स्थानक सुशोभिकरणाच्या हेतूने रोपटे व कुंडी शनिवारी ( ता.2) मोफत देण्यात आल्या आहेत.
       लिनेस क्लबच्या वतीने स्वखर्चाने विविध उपक्रम घेतले जातात. या रोपटे व कुंडी मोफत वितरण कार्यक्रमात बोलताना लिनेस क्लबच्या अध्यक्षा सुनंदा कुलकर्णी म्हणाल्या समाज हितासाठी  शहर लीनेस क्लबच्या वतीने विविध प्रबोधन कार्यक्रम आयोजित करत असून विविध क्षेत्रातील गरजूंना मदत करण्याचं काम केलं आहे. आज बस स्थानकात 12 रोपटी व त्या लावण्यासाठी कुंड्या उपलब्ध करून दिले आहेत पुढील काळात असेच समाज हिताचे कार्यक्रम घेणार असल्याचे अध्यक्षा कुलकर्णी म्हणाल्या. 
यावेळी आगार प्रमुख संतोष बिरादार, सहाय्यक पृथ्वीराज कोकाटे, चांदमियाॅ देशमुख, सचिव कौशल्या पवार, कोषाध्यक्ष उषा सुडे, रेखा हाके, , राणी महाजन, नलिनी बेंबडे, शोभा राजपंके, शीला घाटोळ, शितल महाजन, मंगल नागपुर्णे, संगीता आबंदे, वनिता बुजरूग,  वंदना केंद्रे, प्रतिभा गोरटे, प्रणिता बिराजदार यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!