नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांचा वाढदिवसनिमित्त शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमानी होणार साजरा सहसचिव प्रदीप खाडे यांची माहिती

नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांचा वाढदिवसनिमित्त शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमानी होणार साजरा सहसचिव प्रदीप खाडे यांची माहिती

परळी वैजनाथ ( गोविंद काळे) :- परळी शहरातील नावाजलेल्या नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने दि. 8 ते 15 जुलै शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची अशी माहिती नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. धनंजय मुंडे म्हणजे परखड नेतृत्व. मंत्रिमंडळात काम करताना नेहमी शैक्षणिक शेतकऱ्यांच्या व विविध विषयाची बाजूने ठामपणे उभे राहून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल या साठी नेहमी त्यांचे प्रयत्न असतात. म्हणूनच ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 8 ते 15 जुलै विविध शैक्षणिक सांस्कृतिक तसेच लोकोपयोगी व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आतंरशालेय स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा, वृक्षरोपण व संवर्धन, आरोग्य तपासणी, वादविवाद स्पर्धा, रक्तगट तपासणी, संगित स्पर्धा अशा तालुक्यातील विविध स्पर्धा मिलिंद विद्यालय, शारदा विद्या मंदिर बँक कॉलनी, सौ. शारदाबाई मेनकुदळे विद्यालय संगम रोड याठिकाणी स्पर्धा होणार आहेत.
ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांमध्ये परळी तालुक्यातील शाळा व विध्यार्थीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आव्हान नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे तसेच संस्थेचे समन्वयक तथा यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य प्रा. अतुल दुबे, प्राथमिक विभागाचे समन्वयक आर. जे. ओझा, मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य /मुख्याध्यापक बी. जी.कदरकर, पर्यवेक्षक एम आर.धायगुडे, शारदा विद्या मंदिरचे मुख्याध्यापक ए. व्ही.लोणीकर, सौ. शारदाबाई मेनकुदळे विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. एस.साखरे, मिलिंद प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. राठोड, शारदा विद्या मंदिर प्राथमिकचे मुख्याध्यापक श्रीमती एस. एल. धस आदींनी केले आहे.

About The Author