उदगीर रोटरीच्या वतीने वंध्यत्व तपासणी व मार्गदर्शन शिबीर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व कवठाळे हॉस्पिटल आई आयव्हीएफ व टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे निमित्त मोफत व्यंध्यत्व तपासणी व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
कवठाळे हॉस्पिटलमध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीच्या अध्यक्षा मंगला विश्वनाथे होत्या. यावेळी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय महिंद्रकर, डॉ. विजय कवठाळे, रोटरीच्या सचिव सरस्वती चौधरी, डॉ. स्वप्नांजली कवठाळे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. सुलोचना येरोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी २५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. वंध्यत्वासारखे आजार आजच्या या धावपळीच्या जीवनात रासायनिक अन्नाच्या सेवनामुळे तसेच व्यसनाधीनतेमुळे वाढत असून योगा व निर्व्यसनी जीवनशैली अंगिकारल्यास अशा आजारांपासून संरक्षण होते, असे यावेळी डॉ. विजय कवठाळे यांनी सांगितले. कार्यक्रमात डॉ. अजय महिंद्रकर, डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. संगमेश्वर दाचावार, डॉ. महेश जाधव, डॉ. संतोष पांचाळ, डॉ. मोहन वाघमारे, डॉ. विजय कवठाळे, डॉ. स्वप्नांजली कवठाळे, डॉ. विजयकुमार केंद्रे आदी डॉक्टरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल जैन यांनी केले. आभार सचिव सरस्वती चौधरी यांनी मानले.
कार्यक्रमास किशोर पंदीलवार, महानंदा सोनटक्के, डॉ. सुधीर जाधव, विजयकुमार पारसेवार, संतोष फुलारी, गजानन चिद्रेवार, चंद्रकांत ममदापूरे, लक्ष्मीकांत चिकटवार, प्रशांत मांगुळकर, अँड. विक्रम संकाये, राजगोपाल मनियार, ज्योती चौधरी, डॉ. मनीषा पाटील, रवींद्र हसरगुंडे, विद्या पांढरे आदींची उपस्थिती होती.