पोलीस दलात 30 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या 317 पोलीस अमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदाचे वेतनश्रेणी मंजूर

पोलीस दलात 30 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या 317 पोलीस अमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदाचे वेतनश्रेणी मंजूर

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा पोलीस दलातील 30 वर्षे सेवा पूर्ण झालेले 317 पोलीस अमलदारांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ पोलीस उपनिरीक्षक पदाचे वेतनश्रेणीमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे व त्याची सुरुवात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाकडून पोलीस दलातील पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करण्यात आलेला असून पोलीस शिपाई यांना सेवा कालावधीत आश्वासित प्रगती योजनेनुसार पदोन्नती साखळीने पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यास शासन मान्यता देण्यात आली असून लातूर जिल्हा पोलीस दलाचे स्थापनेवरील सेवेची तीस वर्षे पूर्ण झालेल्या 317 पोलीस अंमलदारांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ म्हणून पोलीस उपनिरीक्षक पदाची वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली असून तसे आदेश दिनांक 4 जुलै 2023 रोजी पोलिस अधीक्षकांनी काढले आहेत.

पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झालेल्या पोलीस अंमलदारांना पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त होणार आहेत. पोलिस अमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदाची वेतन श्रेणी मंजूर झाल्याने लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांचे जीवनमान उंचावणार असून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी काढलेल्या आदेशामुळे लातूर पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

About The Author

error: Content is protected !!