उदगीर तालुका जि. प. शिक्षक सहकारी पतसंस्थेत मोबाईल बँकिंग व नेट बँकिंग सुविधा चालू – सर्जेराव भांगे

उदगीर तालुका जि. प. शिक्षक सहकारी पतसंस्थेत मोबाईल बँकिंग व नेट बँकिंग सुविधा चालू - सर्जेराव भांगे

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेत हे संचालक मंडळ सत्तेत आल्यापासून विविध बाबतीत प्रगतीची उत्तुंग भरारी घेत आहे. पतसंस्थेने मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, कोअर बँकिंग व बचत खात्याची सुविधा सुरुवात केली आहे. प्रतिनिधिक स्वरूपात काही सभासद बांधवांनी खाते काढून खात्यात काही रक्कमही भरली. त्याबाबतीत त्यांच्या पतसंस्थेच्या वतीने सत्कारही करण्यात आला.

उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेचे स्वतंत्र ॲप आल्यामुळे सभासदांना आवर्त ठेव, सभासद ठेव, दीपावली कर्ज, शैक्षणिक कर्ज, आकस्मिक कर्ज या सर्व खात्यांचा उतारा मोबाईलवर प्रत्यक्षात पाहता येत आहे, त्यामुळे पतसंस्थेतील कारभार अत्यंत पारदर्शी व विश्वास पूर्ण दिसत असल्यामुळे सभासदांचा विश्वास पतसंस्थेवर वाढला आहे. त्यामुळे पतसंस्थेत ठेवींची संख्या वाढली आहे.

नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, कोअर बँकिंग या सर्व प्रणाल्या उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेत चालू झालेल्या आहेत. त्यामुळे मोबाईल रिचार्ज, लाईट बिल भरणे, डीटीएच रिचार्ज करणे, पैसे पाठविणे यासारख्या सुविधा पतसंस्थेच्या ॲपच्या माध्यमातून सभासद बांधव वापरू शकतात. ही एक अभिमानाची बाब आहे. लातूर जिल्ह्यातील कर्मचारी पतसंस्थेमध्ये सर्वात प्रथम या सुविधा उपलब्ध करून देणारी उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था आहे.

उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सर्व सभासदांना आवाहन करण्यात आले आहे की, पतसंस्थेतील सर्व व्यवहार पतसंस्थेच्या खात्यावर होणार असल्यामुळे सर्व सभासदांनी पतसंस्थेमध्ये आपली बचत खाती काढून घ्यावी, पतसंस्था रात्री आठ पर्यंत चालू असल्यामुळे पैशाचे व्यवहार आपणास रात्री आठ पर्यंत करता येणार आहेत.

उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या विकासामध्ये पतसंस्थेचे चेअरमन माधव अंकुशे, पतसंस्थेचे सचिव सर्जेराव भांगे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार काळे व सर्व संचालक मंडळ व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. असे पतसंस्थेचे सचिव सर्जेराव भांगे यांनी सांगितले.

याप्रसंगी कॅश काउंटर संगणक संच व तिजोरीची विधिवत पूजा मल्लिकार्जुन स्वामी यांच्या शुभहस्ते सर्व शिक्षक नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सदरील कार्यक्रमासाठी शिक्षक नेते पुंडलिक मुळे, अरुण बिरादार, शंकर पाटील, शिवशंकर येळवंतगे, बालाजी कदम, रमेश जाधव,दामाजी बालूरे, मल्लिकार्जुन स्वामी, रविकिरण बलुले, पतसंस्थेचे चेअरमन माधव अंकुशे, पतसंस्थेचे सचिव सर्जेराव भांगे, पतसंस्थेचे संचालक अरविंद धानुरे, व्यवस्थापक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

About The Author