महावितरणच्या बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निरोप

महावितरणच्या बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निरोप

हरंगुळ (प्रतिनिधी) : हरंगुळ सबस्टेशन शाखेतील बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ उपकार्यकारी अभियंता श्री राख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

निरोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकाधिकारप्रमुख तथा हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे आणि शाखा अभियंता भंडारे उपस्थित होते.प्रारंभी याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता राख, लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे, शाखा अभियंता भंडारे यांचा शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच बदली झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपकार्यकारी अभियंता राख, प्रमुख पाहुणे लोकाधिकार प्रमुख तथा हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे, शाखा अभियंता भंडारे यांची भाषणे झाली. ज्यांची बदली झाली आहे त्यानी व इतर कर्मचाऱ्यांनी निरोप समारंभाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले.बदली झालेले अधिकारी व कर्मचारी ज्या मध्ये श्री राख, उपकार्यकारी अभियंता लातूर ग्रामीण येथून पाटोदा जिल्हा बीड येथे बदली झाली आहे, श्री सय्यद, प्रधान यंत्रचालक हरंगुळ येथून मुरुड येथे बदली झाली आहे. कांबळे यंत्रचालक नवीन एमआयडीसी हरंगुळ येथून तांदूळजा येथे बदली झाली आहे. मंडलिक यंत्रचालक हरंगुळ येथून देवर्जन ता. उदगीर येथे बदली झाली आहे. शेख बशीर प्रधान तंत्रज्ञ हरंगुळ येथून ८ नंबर गरुड चौक, लातूर येथे बदली झाली आहे. घंटे वरिष्ठ तंत्रज्ञ हरंगुळ येथून गंगापूर शाखा येथे बदली झाली आहे. श्रीमती गायकवाड वरिष्ठ तंत्रज्ञ हरंगुळ येथून रेणापूर सब डिव्हिजन येथे बदली झाली आहे. यांचा समावेश होता.

सदर निरोप समारंभ कार्यक्रमास हरंगुळ शाखेतील सर्व तांत्रिक कर्मचारी कोरडे, शिंदे , महाजन, आंबीलपुरे, शिरसाट, राठोड, काळे, पांचाळ, हाके, होळकर, शिरसागर, खुदुस , राजे , भुरे, शिंदे मळवटी, सोनवणे , बालू हरंगुळ, सौ मुजावर, सौ फुलारी, सौ शृंगारे यांच्यासह व्यंकटराव मल्लिकार्जुन पाटील, ज्ञानेश्वर कोतवाड आदी ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थित मान्यवरासह सर्वांनीच बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!