शिक्षक समितीचे लातूर जिल्हा परिषद समोर आंदोलन
लातूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शिक्षकांना सातव्या वेतन आयोगातील थकबाकीची रक्कम जुनी जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह 27 मागण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 25 जुलै रोजी शिक्षक समिती द्वारे राज्यभर राज्यव्यापी धरणे आंदोलन होत आहे लातूर जि प समोर सत्याग्रह आंदोलन 15 जुलै रोजी दोन ते पाच या वेळेत करण्यात येणार असून तशी नोटीस माननीय शिक्षणाधिकारी जि प लातूर यांना देण्यात आली आहे असे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण सोळंके यांनी सांगितले जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालयाच्या निवासाच्या नावाखाली घरभाडे बंद करू नये सातवा वेतन वेतन आयोगातील थकबाकी रक्कम द्यावी शिक्षकांच्या रिक्त जागा भरावे जिल्हा अंतर्गत व अंतर जिल्हा बदलीचा नवीन नियम लागू न करता पूर्वीचे धोरण कायम ठेवावे ,पदवीधर शिक्षकांच्या वेतन त्रुटी दूर कराव्या यासह 27 मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत प्रलंबित मागण्यावर तोडगा काढण्यासाठी मागणी शिक्षक समितीने केली आहे शासनाकडे परत एकदा लक्ष वेधण्यासाठी 15 जुलैला सत्याग्रह आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक समिती दिला आहे हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी किशन बिराजदार राज्य संपर्कप्रमुख ,संजय सूर्यवंशी शिक्षक नेते ,अरुण सोळुंके जिल्हाध्यक्ष ,चंद्रकांत भोजने जिल्हा सरचिटणीस ,भरत पुंड कार्याध्यक्ष ,विजयकुमार कोरे कोषाध्यक्ष रणजीत चौधरी गोपाळ गुट्टे संजय कदम सोमनाथ गटकार परमेश्वर तोंडारे प्रकाश मुर्तुळे शेवाळे राम कमलाकर काकडे मनोज मुंडे प्रवीण काळे तुकाराम पाटील लक्ष्मण टेळे अभय बिराजदार यांनी जिल्ह्यातील तमाम शिक्षकांना आवाहन करत आहेत सदरील आंदोलन हे तीन टप्प्यात करणार असून सध्याचा 15 जुलै चा टप्पा हा पहिला टप्पा आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी आंदोलनाला उपस्थिती नोंदवावी असे आवाहन शिक्षक समितीचे जिल्हा शाखेने केले आहे.