संत ज्ञानेश्वर विद्यालयात लिनेस क्लब अहमदपूर तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

संत ज्ञानेश्वर विद्यालयात लिनेस क्लब अहमदपूर तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अहमदपूर ( गोविंद काळे )संत ज्ञानेश्वर विद्यालयात
लीनेस क्लब अहमदपूर च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बालवाडी, इयत्ता पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांना डबे, वॉटर बॅग, उजळणी चे पुस्तक,कंपास,सह इतर शैक्षणिक साहित्य वाटप केले. लीनेस क्लबच्या माध्यमातून प्रतिवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यातीलच हा एक उपक्रम. यावर्षी लिनेस क्लबच्या चे ब्रीद वाक्य आहे शिक्षण आणि संस्कार या ब्रीद वाक्यावरूनच शैक्षणिक साहित्य विविध शाळेत वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. लीनेस क्लब ने यावर्षी शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याचे ठरविले आहे. यानुसारच शहरातील विविध शाळेतून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.आज दिनांक 13 जुलै 2023 रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयातील इयत्ता पहिलीच्या वर्गात लीनेस क्लब च्या अध्यक्षा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुनंदाताई कुलकर्णी ,एडवोकेट सुवर्णाताई महाजन ,शीलाताई घाटोळ, रेखाताई बालूरे यांच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी पहिलीच्या वर्ग शिक्षिका सुप्रिया मुंडकर ,शारदा तिरुके शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई रोडगे यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!