उदगीर ते हत्तीबेट बस सुरू चालक व वाहकाचा सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर या आगाराची उदगीर ते हत्तीबेट अशी बससेवा मंगळवार पासून सुरू झाली आहे. ही बस हत्तीबेटावर पोहचताच सुरक्षा रक्षक सचिन सूर्यवंशी,गणेश चव्हाण, बाबुराव राठोड यांनी चालक व वाहकाचा सत्कार केला.
उदगीरहून ही बस सकाळी ११ व दुपारी १५वाजता सुटणार आहे. हत्तीबेटावरील देव देवतांच्या दर्शनासाठी व पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आगार प्रमुख सतीश तिडके, स्थानक प्रमुख धर्मपाल टांगाटूरे, वाहतूक नियंत्रक अनिल पळनाटे यांनी हत्तीबेट पंचक्रोशीतील भाविक व पर्यटकांची मागणी लक्षात घेवून उदगीर ते हत्तीबेट अशी स्वतंत्र बससेवा सुरू केली आहे.
याशिवाय हत्तीबेटावर येणाऱ्या पर्यटक व भाविक भक्तांसाठी उदगीर ते वलांडी मार्गे देवर्जन-हत्तीबेट सकाळी ७.३०, ९.३०, दुपारी १२.३०, १४.३०, सायंकाळी १७ वा. व उदगीर ते साकोळ सकाळी ८.३०, दुपारी १३.३०, सायंकाळी १९.३०वा. या बसेस नियमित हत्तीबेट मार्गे सुरू आहेत. या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आगार प्रमुख सतीश तिडके यांनी केले आहे.