संगायो बैठकीत तब्बल चारशे सोहळा अर्ज मंजुर

संगायो बैठकीत तब्बल चारशे सोहळा अर्ज मंजुर

उदगीर (प्रतिनीधी) : तालुक्यातील तहसील कार्यालयात संगायो राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या सूचनेप्रमाणे लातूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशा प्रमाणे मासिक बैठक उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीला तहसीलदार रामेश्वर गोरे, उदगीर नगरपरिषद मुख्यधिकारी भारत राठोड, उदगीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुळे, संगायो नायब तहसिलदार संतोष गुट्टे, फुटाणे डी.आर., पाटील जी. आर. आदी मान्यवर उपस्थित होते.यात प्रामुख्याने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधना वेतन योजना, इंदीरा गांधी राष्ट्रीय अपंग वेतन योजना, इत्यादी सर्व लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. या मध्ये श्रावण बाळ योजनेतील 327, संजय गांधी निराधार योजना 89 असे एकूण 416 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

About The Author

error: Content is protected !!