सुदर्शन मुंडे संघटन कुशल नेतृत्व – आदिनाथ कोरे

सुदर्शन मुंडे संघटन कुशल नेतृत्व - आदिनाथ कोरे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष व उदगीर दालमिल असोसिएशनचे चेअरमन सुदर्शन मुंडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. असे उद्गार विधिज्ञ आदिनाथ कोरे यांनी व्यक्त केले. सुदर्शन मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फुटबॉल टीमच्या वतीने त्यांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रसिद्ध व्यापारी सोमनाथ पारसेवार, सिंघम पोलीस अधिकारी संजय दळवी पाटील, पो.हे. का. रंगवाळ, पत्रकार सुरेश बोडके, एल. पी. उगिले, सुनील ममदापूरे इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना कोरे म्हणाले की, सुदर्शन मुंडे हे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्त्व आहे. संघटन कुशलतेमुळे त्यांचा मित्रपरिवार खूप दांडगा आहे. व्यापारासोबतच समाजकारण, राजकारण, क्रीडाक्षेत्र, सांस्कृतिक या क्षेत्रातही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. या समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेने सामाजिक कार्यात ते सतत अग्रेसर राहतात. हा त्यांचा गुण सर्वांनी घेण्यासारखा आहे, असेही सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन फुटबॉल टीमचे व्यवस्थापक सुरेश बोडके यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!