अद्यावत क्रिडा संकुल व्हावे, जिल्हा युवक काँग्रेसची मागणी

अद्यावत क्रिडा संकुल व्हावे, जिल्हा युवक काँग्रेसची मागणी

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथे महाराष्ट्र राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे आले असता लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय नीटूरे यांच्या वतीने उदगीर व उदगीर परिसरातील खेळाडूना खेळण्यासाठी अद्यावत क्रिडा संकुल उभे करावे. या भागातून विविध क्रिडा प्रकारातून खेळाडू तयार होऊन उदगीर चे नाव राज्य व देश पातळीवर व्हावे, यासाठी अद्यावत क्रिडा संकुल असणे गरजेचे आहे.म्हणुन युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय भैय्या नीटूरे,उदगीर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बंटी कसबे,फयाज डांगे,तालुका सरचिटणीस नागेश पटवारी,सोनू पिंपरे,सद्दाम बागवान,यशवंत पाटील,आशिष ठाकूर,अजय कबाडे,शिवा पाकोळे व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!