सर्वांनी साथ द्यावी, भाजपचा बालेकिल्ला कायम राखू – जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख (मालक)

सर्वांनी साथ द्यावी, भाजपचा बालेकिल्ला कायम राखू - जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख (मालक)

लातूर (एल.पी.उगीले) : आगामी काळात सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करीत भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख (मालक) यांनी, भाजपाचा बालेकिल्ला असलेला लातूर जिल्हा यापुढेही कायम राखू, असे प्रतिपादन केले.
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथील शक्ती भक्ती मंगल कार्यालयात सोमवारी पार पडली. या बैठकीस पक्षाचे प्रमुख संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हा प्रभारी किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.माजी जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, सचिव अरविंद पाटील निलंगेकर, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ. सुधाकर भालेराव, भाजपा प्रवक्ते गणेश हाके, लोकसभा प्रभारी राहुल केंद्रे, माजी जि. प. सदस्य त्र्यंबक गुट्टे, माजी जि प सदस्य अशोक केंद्रे, माजी जि प सभापती संजय दोरवे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, भाजपाच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव, अमोल निडवदे, वसंत डिगोळे, संचालक तुकाराम मद्दे, राधाकृष्ण कोतलापुरे, भाग्यश्री क्षीरसागर, दत्ता गोरे, काशिनाथ स्वामी, जब्बार पठाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author