व्हटी मध्यम प्रकल्पाच्या पाळुवर झाडे वाढल्यामुळे पाळुला धोका

व्हटी मध्यम प्रकल्पाच्या पाळुवर झाडे वाढल्यामुळे पाळुला धोका

अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प म्हणुन व्हटीचा नामउल्लेख होतो. सन
१९८२ साली व्हटी मध्यम प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले असून प्रकल्पाला ४० वर्ष पूर्ण झाले आहेत. व्हटी मध्यम प्रकल्पाचा सिंचन ऐरिया अंदाजे १००० हे. क्षेत्र असून यापुर्वी तलावाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कर्मचारी असायचे कालंतराने या गोष्टीचा विसर पडत चालल्यामुळे तलावाच्या दुरुस्ती देखभाल कडे कायम दुर्लक्ष होत चालले आहे. व्हटी मध्यम प्रकल्पाचे कार्यालय अहमदपूर येथे असून तेथील अधिकारी कर्मचारी यांना वारंवार निवेदन व तोंडी कळवुन देखील हे अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत.तलावाच्या मागील व पुढील बाजुस प्रचंड मोठमोठी झाडे वाढली असून त्या झाडाच्या मुळ्या खोलवर गेल्याने पाळुला केव्हाही धोका निर्माण होऊ शकतो. वेळीच झाडे तोडली नाही आणि अचानक वरुणराज कोपला तर शेतकऱ्यांच्या जमीनीची हाणी होऊ शकते व पिकांचे नुकासान होऊन शकते व शेतामध्ये वास्तव्यास
असलेल्या शेतकऱ्यांची व गावाची हाणी होऊ शकते.याला जबाबदार कोण ही जबाबदारी कोणाची त्यामुळे वेळीच आपण लक्ष घालुन झाडे तोडण्यांची कामे त्वरीत करून घ्यावीत व होणारा संभाव्य धोका टाळावा अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव रवि सुर्यवंशी यांनी केली आहे. हे प्रश्न मार्गी नाही लागल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
व्हटी मध्यम प्रकल्पाच्या पाळुवर, प्रचंड मोठमोठी झाडं वाढली आहेत, त्यामुळे पाळुला धोका निर्माण झाला आहे याबाबत अहमदपुर येथील पाटबंधारे उप विभाग क्रमांक ९ येथील शिंदे यांनाही मनसेच्या वतीने निवेदन दिले आहे. यावेळी ज्ञानेश्वर जाधव, गोविंद सुर्यवंशी,प्रितम भुतडा उपस्थित होते.

About The Author