मराठा सेवा संघाच्या वतीने प्रा. ढगे सरांचा सन्मान

मराठा सेवा संघाच्या वतीने प्रा. ढगे सरांचा सन्मान

कोरोना संकटकाळात विद्यार्थ्यांसाठी राबविला महत्वपूर्ण उपक्रम

लातूर (प्रतिनिधी) : जागतिक भाषा असलेल्या इंग्रजी विषयात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये या उदात्त हेतूने इंग्रजी विषयाचे ज्ञानार्जन करणाऱ्या ढगेज् इंग्लिश ॲकॅडमीच्यावतीने १५ मे पासून ॲडव्हान्सड बेसिक ग्रामर कोर्स सुरू करण्यात आला आहे. तरी या संकटकाळात विद्यार्थ्यांच्या हिताचा उपक्रम राबविण्यात आल्यामुळे ढगेज् इंग्लिश अकॅडमीचे प्रा. विवेकानंद ढगे व प्रा. सच्चिदानंद ढगे यांच्या या कौतुकास्पद कार्याची दखल घेत मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी माध्य. व उच्च माध्यमिक विभागीय परिक्षा मंडळ, लातूरचे सचिव सुधाकर तेलंग, मराठा सेवासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अभियंता लिंबराज सुर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष वनिता काळे, व्यंकटराव ढगे, मराठा सेवासंघाचे सचिव प्रा. संभाजी नवघरे, मराठा सेवासंघाचे कार्याध्यक्ष अनंत सुर्यवंशी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. झूम ऑनलाईन लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांना कोर्सचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या कोर्समध्ये ५ वी ते १२ वी , सर्व स्पर्धा परीक्षा व गृहिणीसाठी बेसिक ग्रामर असे विद्यार्थ्यांची दररोज ४ तास तयारी करून घेतली जात आहे. सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे हे लक्षात घेता विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क माफी केली आहे तर वंचित घटकातील विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये संपूर्ण घरातील सदस्यही या उपक्रमाचा लाभ घेत आहे. तरी ढगेज् इंग्लिश ॲकॅडमीच्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत मराठा सेवा संघ यांच्या वतीने अकॅडमीचे प्रा. सच्चिदानंद ढगे व प्रा. विवेकानंद ढगे यांचा यथोचित सन्मान केला.
यावेळी बोलताना लिंबराज सुर्यवंशी म्हणाले की, ढगेज् इंग्लिश ॲकॅडमी ही खऱ्या अर्थाने लातूरमध्ये विद्यार्थ्यामध्ये इंग्रजी विषयाबाबत असलेली भीती नाहीशी करण्याचे काम करत आहे. ऑनलाईनमुळे अनेकांना इंग्रजी विषयाचे दर्जेदार शिक्षण घेणे शक्य झाले. पुढील बॅचमध्ये मी आणि माझा संपूर्ण परिवार सहभागी होणार आहे असल्याचे सांगितले. सुधाकर तेलंग म्हणाले कि, मागील दोन दशकांपासून ढगेज् इंग्लिश ॲकॅडमी ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी असं कार्य आहे असल्याचे स्पष्ठ केले. वनिता काळे म्हणाल्या की, मी देखील ढगेज् इंग्लिश ॲकॅडमी विद्यार्थिनी आहे. इंग्रजी शिकण्याची अनेक वर्षांपासूनची ईच्छा पूर्ण झाली असल्याचे आवर्जून सांगितले. या छोटेखानी सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. संभाजी नवघरे यांनी केले तर प्रा. प्रा. विवेकानंद ढगे यांनी आभार व्यक्त केले.

चौकट

या सत्काराला उत्तर देताना प्रा. सच्चिदानंद ढगे यांनी मागील दोन दशकांपासून जे विद्यार्थी घडविले आहे ते कसे मनाने’ प्रेमाने जोडले गेले आदी विषयी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. तसेच भविष्यातही अकॅडमी ही आपले विद्यार्थीभिमुख उपक्रम अविरतपणे सुरू ठेवले असा विश्वास व्यक्त केला.

About The Author