तपसेचिंचोली येथे स्पर्श रुग्णालय सास्तुरच्या वतीने कोरोना चाचणी कॅम्प
औसा (प्रशांत नेटके) : सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयाच्या फिरत्या वैद्यकीय पथकाच्या साहाय्याने तपसेचिंचोली येथील पोस्ट ऑफिस परिसरात 13 जून रोजी 96 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आढळून आले आहेत.
तपसेचिंचोली येथे एप्रिल पासून आज पर्यंत जवळपास 38 कोरोनाबाधित रुग्ण,आणि 3 रुग्ण दगावले असून गेल्या 15 दिवसांपूर्वी 2 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. दरम्यान गाव कोरोनामुक्त व्हावे यासाठी ग्रामपंचायत कडून फवारणी ,जनजागृती ,आदी उपाययोजना केल्या जात आहेत. या सोबतच स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय फिरत्या पथकाच्या माध्यमातून गावात जनजागृती करण्यात आली. त्यानंतर 96 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीअंती सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत .त्यामुळे गावाची कोरोनामुक्ती कडे वाटचाल सुरू झाली आहे. या पथकात डॉ प्रशांत जाधव, सुपरवायझर किरण कदम, पवन गायकवाड, छबुताई माने, पुनम राजपुत, प्रतीक्षा गोरे, बालाजी क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी गावचे सरपंच विश्वंभर सुरवसे, प्रशांत नेटके, देवदत्त जोशी, राजकुमार गिरमले , शिवशंकर बिराजदार, आशा कार्यकर्ती जनाबाई वाघमारे, सुवर्णा काळे, आदी उपस्थित होते.