उदगीर येथे शासकीय सुसज्ज रूग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय व्हावे म्हणुन पूर्ण पाठपुरावा करणार – ना.डॉ.नीलम गोऱ्हे
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहराचा भौगोलिक परिस्थिती आणि तेथील आरोग्ययंत्रणेवर पडणारा ताण पाहता उदगीर येथे मेडिकल कॉलेज व सुसज्ज रूग्णालय सुरू करण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करणार. असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज केले. तसेच ”माझे उपसभापती कार्यालय” हे समस्त उदगीरकर आणि येथील शिवसेना, युवासेना कार्यकर्त्यांसाठी सदैव खुले असेल, असे देखील त्यांनी सांगितले. त्या शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.गोऱ्हे यांच्या निधीतून १० लाखचे देण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आणि आदित्यजी ठाकरे यांच्या सहकार्यातून उदगीर येथील शासकीय हॉस्पिटलला आठ व्हेंटिलेटर देण्यात आले होते, ते आज हॉस्पिटलला सोपविण्यात आले, या प्रसंगी त्या बोलत होत्या.
डॉ.गोऱ्हे पुढे बोलताना म्हणाल्या की, उदगीर येथे वैद्यकीय सेवेत सेवा करताना मला उदगीरच्या जनतेने मोठे सहकार्य केले. येथील कार्यकर्त्यांना सर्वोतोपरी मदत मी करणार असून, त्यांना आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील दिले. तसेच उदगीरची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर बैठक घेऊन कार्यवाही करणार असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
सर्व साहित्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ना.डाॅ. निलमताई गोऱ्हे उपसभापती विधानपरिषद यांच्या हस्ते लोकार्पण ऑनलाइन झाले,यावेळी सुरज दामरे संपर्कप्रमुख युवासेना लातूर, उपजिल्हाप्रमुख रामचंद्र अदावळे, वैद्यकीय झोनल अधिकारी श्री डॉ. हरिदास सर,सिव्हीलसर्जन,डॉ देशपांडे सर,डॉ भोसले सर,महसूल च्या वतीने गुट्टे नायब तहसीलदार, नीलम ताईचे स्वीय साहाय्यक योगेश भाऊ जाधव, श्रीमंत सोनाळे विधानसभा संघटक,सचिन साबणे जिल्हाकार्याधेक्ष शिक्षक सेना, चंद्रकांत टेंगेटोल तालुका प्रमुख, बिरादार तालुका संघटक, मैनाताई साबणे-अरुणा लेंडाणे माजी महिला जिल्हाप्रमुख, अंकुश कोनाळे,विकास जाधव, तानाजी वडले, रामदास काकडे, कुलदीप पाटील, मॅच्छिंद्र मोरे उपतालुका प्रमुख, दत्ता मोरे शहर प्रमुख, अंकुश ताटपल्ले, रमण माने युवासेना उपजिल्हाधिकारी, उपेंद्र काळेगोरे तालुकाधिकारी,विष्णु चिंतालवार, प्रदीप पाटील,अनिल मोरे,संजय मठपती, विक्की गवारे उपशहरप्रमुख,व्यंकट केसगिरे, व्यंकट साबणे, गणेश पांचाळ आदी शिवसेना पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासन उपस्तीत होते.