जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे 25 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे 25 ऑगस्ट रोजी आयोजन

लातूर (प्रतिनिधी) : रानभाज्यांचे महत्व लोकांना पटवून देणे व विपणन साखळी निर्माण करण्यासाठी सन 2023-24 मधील जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव 25 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वा. दरम्यान होणार आहे. लातूर येथील अंबाजोगाई रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालय येथे होणाऱ्या या रानभाजी महोत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवामध्ये रानभाज्या व रानफळांची वैशिष्टे, गुणधर्म व त्यांचा आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती (रेसिपी) याची सचित्र माहिती देण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी रानभाज्या व फळे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. तरी या रानभाजी महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रानभाज्या व रानफळे विक्रीसाठी घेवून यावीत. अशा शेतकऱ्यांसाठी विक्री व्यवस्थापन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व नागरीकांनी रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग नोंदवून रानभाज्यांची माहिती घेवून खरेदी करावी, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!