शिरूर ता.येथे सामुहिक विवाह सोहळा संपन्न
अहमदपुर (गोविंद काळे) : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सर सय्यद अहेमदखां बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व शिरूर ताजबंदच्या ग्रामस्थांच्या पुढाकाराने नुकताच सामुहिक विवाह सोहळा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. शिरूर ताजबंदच्या महेश विद्यालयात वैष्णवी किरण वाघमारे हिचा विवाह महेश वैजनाथ समुखराव यांच्याशी तर दिपाली लक्ष्मण कांबळे हिचा विवाह ज्ञानेश्वर रावसाहेब वाघमारे यांच्याशी संपन्न झाला. या दोन नव दांपत्याच्या विवाह कोवीडचे नियमांचे पालन करुन मोठ्या उत्साहात सामुहिक विवाह सोहळा संपन्न झाला.यावेळी विवाह सोहळ्यास मदत केलेल्या दानशूर व्यक्ती चा यथोचित सत्कार माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन अलाउद्दीन किनीवाले यांनी केले होते तर स्वागताध्यक्ष म्हणून शिवानंद भोसले हे होते. यावेळी अहमदपूर पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रशेखर पाटील, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रोहीदासजी वाघमारे, चाकुर पंचायत समितीचे उपसभापती सज्जन लोणाळे,माजी सरपंच बालाजी सारोळे,सभाष गुंडरे, शिवराज पाटील, गोविंद गिरी , महेश बिलापट्टे, विक्रम भोसले, जयवंत सगर, रणधीर पाटील,हणमंत बडगिरे,एन टी.बिरादार, इस्माईल किनीवाले, गजेंद्र वलसे, मुन्ना शेख, राहुल वाघमारे, मच्छिंद्र कांडनगिरे, हणमंत बडगिरे, यशवंत कांबळे,हसन शेख, आनंद वर्मा,आशिष किनीवाले, साहाय्यक अभियंता प्रिया मोघडकर, डॉ.बालाजी साबदे, डॉ.मधुकर देशमुख, शिवचंद्र मलफेदवार, मारुती मोरे, बालाजी वाघमारे, संजय राजे, संजय वाघमारे, बालाजी गुंडरे, रमेश कोरावार आदिंसह दोन्ही कडील वराडीमंडळी व ग्रामस्थ या सामुहिक विवाह सोहळ्यास उपस्थित होते.