निलंगा तालुक्यात तिथली पंती आणि सोरट झालेत सैराट

निलंगा तालुक्यात तिथली पंती आणि सोरट झालेत सैराट

निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा तालुक्यामध्ये सध्या अवैद्य धंद्यांनी माहेरघर केले असून, काटेजवळगा येथे खुलेआम सोरट नावाने ओळखल्या जाणाऱ्या जुगाराचा बाजार मांडला गेला आहे. एकंदरीत निलंगा तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अवैध धंदे यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना माहिती आहेच! परवाच मटक्याच्या संदर्भात एका महिलेकडून शरीरसुखाची मागणी केल्याचाही प्रकार निलंगा तालुक्यात झाला आहे. एकंदरीत काय तर अवैध धंद्यांना पाय फुटले आहेत!

 कोरोना काळात पोलिसांनी चांगली कामगिरी केली म्हणून पाठ थोपटली जात असतानाच, अवैद्य धंद्याला खुलेआम सूट दिल्यामुळे या उत्कृष्ट कामगिरीला काळीमा फासण्याचे पाप काही झारीतले शुक्राचार्य करत आहेत. एका बाजूला चांगले काम केले म्हणून कोरोना योद्धा म्हणून नावाजले जात असतानाच अवैद्य धंदेवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यामुळे जनसामान्यात पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या सत्कार प्रसंगी दस्तुरखुद्द जिल्हा पोलिस अधीक्षकांनी निलंगा आणि औराद शहाजानी भागातील अवैद्य धंदे जेव्हा बंद होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये सुख-शांती अर्थात कायदा आणि सुव्यवस्था कार्यरत राहील अशा आशयाचे वक्तव्य केले होते. पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला माहिती असतानादेखील हे अवैध धंदे का बंद होत नाहीत? हा जनसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी निर्माण केलेले विशेष पोलीस पथक नेमके काय करते आहे ?याचे आत्मपरीक्षण वरिष्ठांनी करणे गरजेचे आहे. मटका, तितली पंती, सोरट हे नव्याने वाढले आहेत. निलंगा आणि औराद शहाजानी परिसरात कर्नाटकातून येणारा अवैध गुटका महाराष्ट्रात चर्चिला जातो आहे. त्याला पाबंद कोण करणार? महाराष्ट्र शासनाने ज्या उदात्त हेतूने गुटखाबंदीचा निर्णय घेतला त्या निर्णयाला हरताळ फासण्याचे पाप पोलीस करत आहेत अशी खुलेआम चर्चा आहे.

About The Author