महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी

महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने रविवार दि.१३ जून रोजी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रंसगी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी डॉ . रमेश पारवे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की,”महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते. महाराणाचे पूर्वज मेवाडचे शासक आणि त्यांचे हिंदुवंश भगवान राम यांनी उत्पन्न केलेले सूर्यवंशी वंशातले होते. मेवाडच्या राजघराण्यावर ‘बाप्पा रावळ ‘, ‘राणा कुंभ ‘ आणि ‘रणा संग ‘ अशा अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले.महाराणा प्रताप यांच्या शौर्याची कारकीर्द इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. महाराणा प्रतापसिंह एक वीर राजपूत योद्धा आणि उत्तम युद्ध रणनीतिज्ञ होते”. असे प्रतिपादन याप्रसंगी केले.

महाराणा प्रतापसिंह यांच्या अभिवादन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ शिवाजीराव जवळेकर, डॉ.अंकुशकुमार चव्हाण, डॉ.सदिपान जगदाळे, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा.सचिन पतंगे, कार्यालयीन कर्मचारी रामकिशन शिंदे, विक्रमसिंह ठाकूर आदी उपस्थित होतेहोते.

About The Author