कोरोनाच्या परास्थितीत कुटूंबाची मनस्थिती सांभाळा – गणेशदादा हाके पाटील
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ऑनलाईन पालक मेळावा संपन्न.
अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोना हे जागतिक संकट असून आहे त्या परिस्थितीत सकारात्मक विचार करून पालकांनी आपल्या कुटुंबाची मनस्थिती सांभाळावी. पाल्याच्या अभ्यासाची, आहाराची व आरोग्याची काळजी घ्यावी.त्यांच्याशी सुसंवाद साधवा.असे आवाहन संस्थाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या ऑनलाइन पालक मेळाव्यात बोलताना केले.
या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष मा.श्री. गणेश दादा हाके पाटील व प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे, विषय तज्ञ चंद्रकांत मोघे,सुरेश वट्टमवार सह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक मेळाव्यातून पालकांना शाळेच्या उपक्रमाबद्दल व ऑनलाईन अध्यापनाच्या नियोजनाबाबत माहिती देण्यात आली.सर्वप्रथम स्वरांजली थोटे या विद्यार्थिनीने स्वागत गीत म्हणून उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत केले.त्यानंतर कोरोनाचे बळी ठरलेल्या मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
गणेशदादा हाके पाटील यांनी पुढे आपल्या मनोगतातून शाळेतील उत्कृष्ट कामगिरी, नवोपक्रम व नियोजनाबाबत शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे तोंडभरून कौतुक केले .तसेच पालक-बालक यांचे मागील सत्रात मोलाचे योगदान, चांगले सहकार्य लाभले. बालक, पालक, शिक्षक यांच्या त्रिवेणी संगमातून विद्यार्थी निश्चित यशस्वी होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यानंतर स्पर्धा परीक्षेस मार्गदर्शन करणाऱ्या सविता पाटील, शारदा तिरुके, सतिष साबणे तसेच विषय शिक्षक शबाना शेख, अर्चना जांबळदरे, सुजाता बुर्गे,पालक श्रीराम फाजगे,कुद्दुस पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन संगीता आबंदे व आभार नंदकुमार मद्देवाड यांनी मानले. शेवटी त्रिगुना मोरगे मॅडम यांनी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.