कासार सिरसी व परिसरासाठी आणखीन पाचशे कोटीची तरतूद करणार – आ. अभिमन्यू पवार
निलंगा (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसी व परिसरासाठी आणखीन पाचशे कोटी रुपयाची तरतूद करून एक मॉडेल सिटी करणार असल्याचे मत कोराळी वाडी येथील कार्यकर्ते भास्कर पाटील यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलताना आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी म्हणाले.यावेळी आमदार अभिमन्यू पवारसाहेब साहेब, मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे येथील पोलीस निरीक्षक रियाज शेख साहेब, कोराळी माजी सरपंच कल्पनाताई गायकवाड, उपसरपंच संजीव मामाळे, मंडळ संघटक धनराज होळकुंदे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जिलानी बागवान, परमेश्वर बिराजदार नाना धुमाळ वाडी कासार सरपंच महेश मंडले, उपसरपंच राहुल ईश्वर,मेजर मोहन कर्णे रामराव मिलगिरे पंडित रेवणे,नामदेव मंडले महेश मामाळे उमेश बुकले विलास पाटील गोविंद मिलगिरे सूर्यकांत दगदाडे अशोक मिलगिरे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण औसा मतदारसंघांमध्ये भरपूर विकास कामे चालू आसून नागरिकांच्या वाढत्या गरजा समजून घेऊन अजून यापुढे भरीव निधी आणून मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांसाठी मागील वर्षाची आमदार निधी हे फक्त शेत रस्त्यासाठी दिलेला होता ते यशस्वी झालेला आहे यावर्षीचा आमदार निधी हे संपूर्ण मतदारसंघातील जनतेच्या तहान भागवणाऱ्या गावातील सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी सेपरेट डीपी देण्यासाठी खर्च केला जाईल असेही यावेळी म्हणाले.