अहमदपूर चाकूर मतदारसंघासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर – आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर चाकूर मतदारसंघासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर - आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : सम्यक दृष्टी आणि नियोजनातून मतदारसंघातील विकास कामांना गती देण्यासाठी आ.बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्यातून राज्य शासनाच्या वतीने विकासनिधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतूदीतून ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा योजनेंतर्गत विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. अहमदपूर चाकूर मतदारसंघासाठी गावांतर्गत मुलभूत सुविधा योजनेंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.

About The Author