१५ लक्ष रुपयांच्या श्री हनुमान मंदिर सभागृहाचा शुभारंभ आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न!

१५ लक्ष रुपयांच्या श्री हनुमान मंदिर सभागृहाचा शुभारंभ आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न!

अहमदपूर (गोविंद काळे) : मौजे सोरा ता. अहमदपूर जि. लातूर येथे श्री हनुमान मंदिराच्या १५ लक्ष रुपयांच्या सभागृहाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून हनुमान मंदिराच्या सभागृहाचा शुभारंभ केला आणि श्री हनुमानाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधला व नागरिकांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. श्री हनुमान मंदिर सभागृह पूर्णत्वास गेल्याने नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. या सभागृहामुळे गावातील जनतेला विविध कार्यासाठी हे सभागृह वापरणे शक्य होणार आहे, याचे समाधान वाटते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्धवरावजी अण्णाराव चंदाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकरावजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद तात्या हेंगणे, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीरा कांबळे, माजी जि.प. सदस्य माधवराव जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील, श्याम पाटील देवकते, मावलगाव सरपंच शिवाजीराव संपते, शहराध्यक्ष अजहर बागवान, युवक अध्यक्ष दयानंदराव पाटील, चेअरमन हरिभाऊ कदम, सोराचे सरपंच अर्चनाताई कांबळे, सरपंच संतोषजी होळकर, अविनाशजी मंदाडे, साहेबराव सोरगेकर, महेशराव कदम, चेअरमन सोरा यशवंतराव इंगळे, मावलगाव चेअरमन कासले, संगीताताई मेकले, वर्षाताई बायस, सुरेखाताई मुठाळ, अंकुशराव मेकले, गजानन मेकले, गोपाळ बयास, गजानन चंदाले, निवृत्तीराव मेकले, रमाकांत चंदाले, व्यंकटराव चंदाले, बाळाजी चंदाले, शिवाजीराव सूर्यवंशी, पांडव बयास, राजराम पानगटे, विजयसिंग पोलीस पाटील, बाबुराव चंदाले, बाबुराव बयास, बळीराम बयास, लक्ष्मण मेकले, भगवंतराव चंदाले, गोविंद बयास, बंडू बयास, मल्हारी बयास, मच्छिंद्र मेकले, पद्माकरराव पानगटे, उत्तमराव मेकले, आकाश आरसुळ, रमेश बयास, संजय बयास, अशोकराव सोनकांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिसोदे सर यांनी केले तर सूत्रसंचालन संभाजी चोपणे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!