लातूर जिल्हा परिषदेचा 51 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प – जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे

लातूर जिल्हा परिषदेचा 51 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प - जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकिय दवाखाने, अंगणवाडी परिसरात जिल्हा परिषदेच्या वतीने 20 जून ते 25 जून 2021 या कालावधीत 51हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आज जिल्हा परिषदेत घेतलेल्या विशेष बैठकीत लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केला. या बैठकीस लातूर जि.प.चे उपाध्यक्ष भारतबाई सांळुके, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे, जि.प.सदस्य प्रशांत पाटील, विभागीय वनाधिकारी शिंदे एस.एस जिल्हा आरोग्य अधिकारी परगे, पशुसंवर्धन अधिकारी पडिले शिक्षणाधिकारी दशवंत, श्रीमती अंधारे सर्व तालूका आरोग्य अधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!