महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचा 23 वा वर्धापनदिन साजरा
उदगीर(प्रतिनिधी) : बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ, अहमदपूर द्वारा संचलित धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर,जिल्हा:-लातूर येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकचा 23 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण कॉलेजचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ संजय बिरादार(निवासी वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय, उदगीर)उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ गीत गायन व ध्वजवंदन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ.दत्तात्रय पाटील म्हणाले की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून स्थापनेपासुनच विविध चिकित्सा पद्धतीमध्ये नवनवीन अत्याधुनिक संशोधन होत असुन सद्यस्थितीत मागील दीड वर्षापासून समाजाचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी कोवीड -19 जनजागरण व उपचार-शस्त्रक्रिया याकरिता मोलाचे व भरीव कार्य तथा अतुलनीय योगदान दिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.वैभव बिरादार यांनी तर आभार प्रदर्शन विनायक काळे यांनी केले. कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिपक चव्हाण, डाॅ. सौरभ सोळंकी, श्रीमती मानकोळे तथा धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेज व सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तथा आंतरवासियता प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.