अनिशा घोडके हिचा ना. बनसोडे यांच्या हस्ते सत्कार

अनिशा घोडके हिचा ना. बनसोडे यांच्या हस्ते सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात तृतीय आल्याबद्दल कुमारी अनिता गोपाळकृष्ण घोडके हिचा ना. संजय बनसोडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. उदगीर येथील कुमारी अनिशा गोपाळकृष्ण घोडके ही एम एस सी वनस्पती शास्त्र या विषयात 92.36% घेऊन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात सर्व तृतीय आली आहे. उदगीरच्या शिवाजी महाविद्यालयात शिकत असलेली कुमारी आणिशा घोडके ही केंद्र शासनाच्या एम एस एस एस परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले (स्कॉलरशिप) तिच्या यशाबद्दल मंत्री संजय बनसोडे यांच्या वतीने सत्कार करण्यात. व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्याप्रसंगी प्रा. प्रवीण भोळे, प्रा. शाम डावळे, बाळासाहेब मारलापले, समीर शेख ,अनिल मुदाळे, संदीप पाटील, संतोष पाटील, प्रा वीरकपाळे, प्रा पतंगे , पिंटू घोडके , बिरादार व मित्र परिवार उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!