संभाजी ब्रिगेड च्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून गांधीगिरी 

संभाजी ब्रिगेड च्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून गांधीगिरी 

उदगीर( एल.पी. उगिले) : उदगीर शहरातून जाणारे सर्वच प्रमुख रस्ते खड्डेमय झाले असून या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन काही फायदा झाला नाही. आंदोलनाचा इशाराही दिला होता, मात्र त्याही बाबीकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने बेशरम आंदोलन असे अभिनव आंदोलन राबवत शहरातील मुख्य चौका चौकात पडलेल्या खड्ड्यात बेशरमाचे झाडे लावून शासनाच्या आणि प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदवला.या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाच्या नंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात रितसर निवेदन देऊन लवकरच रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

About The Author

error: Content is protected !!