ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचा हॉलीबॉल संघ सलग दुसऱ्या वर्षीही विभागीय स्पर्धेसाठी पात्र

ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचा हॉलीबॉल संघ सलग दुसऱ्या वर्षीही विभागीय स्पर्धेसाठी पात्र

उदगीर (एल.पी.उगीले) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील जवळपास सर्व शाळांनी सहभाग नोंदवला. यामधून ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलच्या 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी चांगली कामगिरी करत आपला दबदबा कायम ठेवत विजयश्री खेचून आणली. जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला, व विभागीय स्पर्धेसाठी पूर्ण संघ पात्र ठरला आहे. यामध्ये कर्णधार शूटर सुमित शेळके, संस्कार लाडाने, प्रज्वल गोसावी, वैभव भातांबरेकर, आदित्य गव्हाणे, सुमित धुमाळ व सोहेल शेख या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करत दोन्हीही सेट एकतर्फा जिंकुन विजयश्री खेचून आणली, व आपली पात्रता विभागीय स्पर्धेसाठी सिद्ध केली. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बिरादार यांनी सर्व मुलाचे स्वागत सत्कार करून अभिनंदन केले. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर सुजित बिरादार, शाळेचे सीईओ रामेश्वर सगरे, प्राचार्य आम्रपाली सरवदे, यांनी अभिनंदन करून मुलांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक विठ्ठल गुरमे, विशाल कांबळे व रामेश्वर सगरे यांनी मार्गदर्शन केले.

About The Author

error: Content is protected !!