होऊ द्या चर्चा”च्या माध्यमातून भाजपचा खोटारडेपणा जनतेसमोर मांडा – जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

होऊ द्या चर्चा"च्या माध्यमातून भाजपचा खोटारडेपणा जनतेसमोर मांडा - जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

देवणी (प्रतिनिधी) : संपूर्ण देशामध्ये खोटारडेपणाचे बोलघेवडेपणाचे पीक पिकवून भारतीय जनता पार्टीने तमाम जनतेला वेड्यात काढण्याचे काम केले आहे या भाजपाचा खोटारडेपणा जनतेसमोर मांडा असे देवणी येथील संघटनात्मक बांधणी व होऊ द्या चर्चा संदर्भात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलताना लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी सांगितले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात होऊ द्या चर्चा च्या माध्यमातून आपणाला या खोटारड्या भाजपाच्या अनेक फसव्या घोषणाचा बुर्खा टरा टरा फाडावयाचा आहे तसेच बेरोजगारी बाबत दिलेले आश्वासन गॅसच्या वाढलेल्या किमती महागाई पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव केंद्र सरकारचे महाराष्ट्रद्रोही धोरण याचबरोबर भाजपने शिवसेने सोबत केलेली गद्दारी अशा विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली याच बैठकीमध्ये काही संघटनात्मक निर्णय घेण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यावेळी शिवसेनेचे निलंगा विधानसभा समन्वयक पदी पंडित भंडारे तर तालुका समन्वयक म्हणून धनराज बिरादार तालुका संघटक म्हणून लक्ष्मण बिरादार उपतालुकाप्रमुख बोरोळ गट म्हणून बालाजी बिरादार उपतालुकाप्रमुख वलांडी गटासाठी विष्णूबन महाराज तर जवळगा गटासाठी संजू बिरादार व देवणी तालुका सोशल मीडिया तालुकाप्रमुख म्हणून यशवंत ठाकरे यांची निवड करण्यात आली याच बरोबर महिला आघाडीच्या देवणी शहर संघटिका म्हणून बेबी सरोजा कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्यासोबत महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका डॉक्टर शोभाताई बेंजर्गे निलंगा विधानसभा उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे तालुकाप्रमुख मुकेश सुडे शहर प्रमुख दीपक स्वामी यांच्यासह असंख्य शिवसेना आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!