मुस्लिमांना १० टक्के आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण देण्यात यावे
मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन
अहमदपूर (गोविंद काळे) : मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा.धर्माच्या नावाखाली देशात मॉबलिंचिंगच्या घटना घडत आहेत.धार्मिकतेच्या आड येऊन मुस्लिम समाजातील व्यक्तींच्या हत्या केल्या जात आहेत. शिवाय, जातीला कलंकित करण्याचे कामही काही लोक करत आहेत.मॉबलिंचिंग केलेल्या मोहसीन शेखला न्याय देण्यात यावा.मॉबलिंचिंग विरुध्द कायदा तयार करावा. प्रत्येक जिल्ह्यत मुस्लिम मुलां- मुलींसाठी वस्तीगृह उभारण्यात यावे. बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर मुस्लिम मुंला – मुलींना युपीएससी -एमपीएससी साठी संख्या स्थापन करण्यात यावी.मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळांच्या निधित वाढ करण्यात यावी. राज्यातील वक्फ च्या जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावेत आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे बळकटीकरण करण्यात यावे. वक्फ संपतीचा अहवाल सार्वजनिक करावा. मुस्लिम समाजावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अत्याचार रोखण्यासाठी अट्रासिटीसारखा अल्पसंख्याक अन्याय अत्याचार प्रतिबंधक सरंक्षण कायदा तयार करुन त्याची लवकरात लवकर अमलबजiवणी करण्यात यावी.
अशा विविध मागण्याचे निवेदन मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने १८ जून रोजी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार यांच्या मार्फत केली आहे. यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समिति अय्याज शेख, कलिमोदींन शेख,उस्मान बागवान, दस्तगीर शेख अजहर बागवान, नगरसेवक ताजोदीन सय्यद, अशोक सोनकांबळे, हाफिज जावेद, इमरोज़ पटवेगर,शेखू भाई, अफ़रोज़ पठान, हुसेन मनियार, फारूक मनियार,मज़र हाफेसाब, राशेद हाफेसाब, मोबीन शेख, मेहमूद सय्यद, अनीस कुरेशी, रमजीद सय्यद, हाजी शेख, जमु बागवान, महेबूब बागवान, कलीम तंबोली, इब्राहिम बिस्ती, आवेज शेख,रमजान शेख़, माजिद बागवान मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांची उपस्थिती होती.