मनोज जरांगे पाटील यांची अहमदपुरात जाहीर सभा

मनोज जरांगे पाटील यांची अहमदपुरात जाहीर सभा

अहमदपूर (गोविंद काळे) : सकल मराठा समाज अहमदपूर यांच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी संवेधानिक मार्गाने सुरू असलेल्या साखळी उपोषणाची दखल घेऊन आरक्षणाचे प्रणेते श्री मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचा दौरा जाहीर केल्याप्रमाणे अहमदपूर येथे दिनांक 3 ऑक्टोबर सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार असून याबाबत नियोजन आराखडा तयार करण्यासाठी अहमदपूर येथील सकल समाज बांधव समन्वय समितीच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीनारायण मंदिर मंगल कार्यालय अहमदपूर येथे आढावा बैठक घेऊन विविध समित्यां तयार करण्यात आल्या. यामध्येस्वागत व संयोजन समिती, अर्थ व नियोजन समिती , व्यासपीठ व वाहनस्थळ व्यवस्थापन समिती, प्रसिद्धी समिती ,बैठक व्यवस्थापन समिती व इतर समित्या गठीत करून सभा यशस्वी करणेबाबत चर्चा करण्यात आली. या मध्ये तालुका स्तरीय समिती व तालुक्यातील शिरूर ताजबंद, हडोळती, रोकडा सावरगाव,अंधोरी,खंडाळी, किनगाव अशी सर्कल नुसार समित्या तयार करून नियोजन करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन स्थळी व्यासपीठ असेल व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक बायपास मार्गे वळविण्यात आली आहे. अहमदपूर तालुका व परिसरातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी या सभेसाठी शिस्तीचे पालन करीत शांततेत उपस्थित राहावे असे आवाहन तालुका समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले.

About The Author