शास्त्री विद्यालयाकडून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना स्वच्छ भारताची स्वच्छांजली अर्पण

शास्त्री विद्यालयाकडून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना स्वच्छ भारताची स्वच्छांजली अर्पण

उदगीर (प्रतिनिधी) : लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय येथे’ स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत, ‘एक तारीख.. एक तास.. स्वच्छतेसाठी..’ महाश्रमदान अभियाना अंतर्गत, स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, पर्यवेक्षक माधव मठवाले, लक्ष्मी चव्हाण, संदीप बोधनकर हे उपस्थित होते.या अभियानाचे महत्त्व सांगताना नीता मोरे म्हणाल्या की, ” स्वच्छतेसाठी अनेक जनआंदोलने झाली. त्यापैकी सर्वात व्यापक आणि महत्त्वपूर्ण जनआंदोलन म्हणजे ‘स्वच्छ भारत अभियान’ होय. भारतातील सर्व शहरे, ग्रामीण भागातील रस्ते स्वच्छ करून सर्वांसाठी मूलभूत स्वच्छतेची सोय सुनिश्चित करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. संत गाडगे महाराज, महात्मा गांधीजी अशा अनेक महामानवांनी स्वच्छतेसाठी अथक प्रयत्न केले आहेत. ” मुख्याध्यापक अंबादास गायकवाड म्हणाले की ” पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे आपला गाव, आपला देश, स्वच्छ आणि सुंदर होणार आहे. महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त स्वच्छ भारताची स्वच्छांजली महाश्रमदान करून अर्पण करण्यात येत आहे”. सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून या स्वच्छता अभियानामध्ये भाग नोंदवला. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नीता मोरे, संदीप बोधनकर, तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी प्रयत्न केला.

About The Author