हंडरगुळी परिसरातील अवैध मटका, गुटखा, दारू, पत्याचे क्लब कायमचे बंद करा नाही तर आंदोलन – इशारा

हंडरगुळी परिसरातील अवैध मटका, गुटखा, दारू, पत्याचे क्लब कायमचे बंद करा नाही तर आंदोलन - इशारा

वाढवना (हुकूमत शेख) : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी हे गांव भारतात जनावराच्या बाजारासाठी तर प्रसिद्ध आहेच मात्र आता हाळी हंडरगुळी हे गाव मटका,गुटखा, अवैध दारू, पत्त्याचे क्लब असे अनेक धंध्यासाठी प्रसिद्ध झाले असुन सामान्य मजुरदार नागरिकांचे या अवैध धंद्याच्या आहारी जाऊन सुखी संसाराची राख रांगोळी करून घेतल्यामुळे, अनेकांचे सुखी संसार उध्वस्त झाल्याचे निदर्शनास येत आहे .कोवळी वयाची मुले, मुली देखील रोज बाप, भाऊ, काका, आजोबा मटका खेळून, गुटखा चगळत, पत्ते खेळून, दारू पिऊन जवळ असलेले सर्व घालुन घरी येऊन सर्व घरातील सदस्यांना मारझोड करणे, शिव्या देणे, पत्नीला अर्थिक व मानसिक त्रास देण्याचे काम याअवैध धंद्या मुळे होत आहे. हे सर्व हंडरगुळी चौकी येथील बिट जमादार खुले आम अवैध धंदे चालु देत असल्यामुळे व त्यांना आपल्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने,अवैध धंदे करणारे मटका एजंट, बुक्की मालक, गुटखा किंग, अवैध दारू विकणारे, क्लब चालवणारे सर्व करोडपती झाले आहेत. व्यसनाधीन सर्व अंबट शौकीन मटका, गुटखा, दारू, पत्ते खेळणारे भिकारी, कंगाल झाले आहेत. दररोज घरात लहान शाळकरी मुलामुलींच्या समोर घरातील अर्धांगिनी, आई वडिलांना देखील सर्व पैसे खेळात, पिण्यात, गुटख्यात, पत्त्यात घालुन घरात भांडण तंटे करताना हे बघुन शाळकरी मुले मुली देखील चिंतीत झाले आहेत. त्यांना लागणारे साहित्य वह्या, पेना देखील मिळत नसल्यामुळे त्या कोवळ्या मुला मुलींचे भविष्य अंधःकारमय बनत चालले आहे. काही जन विध्यार्थी, विध्यार्थिनी तर नाईलाजास्तव शाळेला दांडी मारून मजुरी ला जाऊन शाळेचे साहित्य घेताना दिसत आहेत. या सर्व खुलेआम अवैध धंदयामुळे गोरगरीब कुटूंबाचे तर नुकसान झालेच आहे, पण लहान शिकणाऱ्या, भविष्य असणाऱ्या मुला मुलींना देखील याची झळ लागत आहे. छोटया वयात काम करून शिक्षण साहित्य घ्यावे लागत असुन याहुन दुर्देवी गोष्ट काय असेल ? म्हणूंनच हंडरगुळी चौकी अंतर्गत गावातील व स्थानिक हाळी हंडरगुळी येथील सर्व मटका, गुटखा, अवैध दारू, क्लब कायमचे बंद करा, म्हणुन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 29 सप्टेंबर शुक्रवार रोजी एन. डी. मसुरे यांच्या स्वाक्षरी निशी हंडरगुळी चौकीत सर्व अवैध धंधे कायमचे बंद करा. अन्यथा हाळी येथील शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हाळी च्या वतीने धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे .सर्वांचे लक्ष हाळी हंडरगुळी येथील अवैध धंदे संबंधित अधिकारी, कर्मचारी बंद करतील का ? मजुरदार, कामगार सामान्य नागरिकांची होणारी सामाजिक, अर्थिक होणारी लुट धंदे करणाऱ्या एजंट, मालक, गुटखा किंग, अवैध दारू विक्री करणाऱ्यावर, क्लब चालवण्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करून अवैध धंदे कायमचे बंद करून सामान्य नागरिकांना सुखी संसार करण्याची संधी पोलीस प्रशासन देईल का ?असा प्रश्न महिलांना भेडसावत आहे.

About The Author