यशवंत विद्यालयाच्या तीन पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार संपन्न

यशवंत विद्यालयाच्या तीन पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील रोटरी क्लबच्या वतीने दिला जाणारा सन 2022- 23 चा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार यशवंत विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मुजमील सय्यद आणि योग शिक्षक गौरव चवंडा आणि उदगीरच्या जे एस पी एम उदगीर चा जिल्हास्तरीय गुरु गौरव पुरस्कार प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर यांना मिळाल्याबद्दल शाळेत प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते प्रार्थनेत सत्कार करण्यात आला. यावेळी उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेदेवाड, निर्मला पंचगले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार डॉ. शरद करकनाळे यांनी मांनले. या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!