शिक्षकांनी सेवाभावी वृत्तीने कार्य करावे – डॉ. अशोक सांगवीकर यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षकांना अनाधिकाला पासून माणसं मान सन्मानाचे स्थान असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे घडवण्यासाठी शिक्षकांनी सेवाभावी वृत्तीने कार्य करावे असे जाहीर आवाहन डॉक्टर अशोक सांगवीकर यांनी केले. ते दि. 30 रोजी यश 2 कार्यालयात यशवंत विद्यालया च्या पर्यवेक्षिका निर्मला पंचगल्ले यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या सोहळ्या च्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे , व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक राजेश्वर पारशेटे, सत्कार मूर्ती श्री आणि सौ निर्मलाताई पंचगले, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेदेवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी सत्कार संयोजन समितीच्या वतीने सत्कार मूर्तींचा सत्कार टागोर शिक्षण समिती चे अध्यक्ष डॉ.अशोक सांगवीकर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार, भर आहेर देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सहशिक्षक धनंजय तोकले,प्रतिभा शिरूरकर यांचे मनोगत पर भाषणे झाली. प्रास्ताविक राजकुमार घोटे यांनी सूत्रसंचालन गौरव चवंडा यांनी तर आभार कपिल बिराजदार यांनी मांनले. या सत्कार सोहळ्याला विविध शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, यांच्यासह शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.