ग्रामपंचायत रुद्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

ग्रामपंचायत रुद्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील ग्रामपंचायत कार्यलय व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र याठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची व माझी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच नाथराव केंद्रे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व पूर्व प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार करून अभिवादन केले. तसेच महाराष्ट्र राज्य कामगार दिनानिमित्त आज ग्रामपंचायत च्या वतीने उपसरपंच नाथराव केंद्रे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा व्हाईस चेअरमन दत्ता पाटील सुरनर, ग्रा प सदस्य विजय केंद्रे, ग्रा प सदस्य जयश्री केंद्रे, ड्रॉ नाईक सर, अशाताई जयश्री केंद्रे,अंगणवाडी ताई ज्योती बदने,आरोग्य सेविका सुवर्णा केंद्रे, काशिनाथ केंद्रे गुरुजी, दयानंद गवळे, भानुदास केंद्रे प्रभाकर चंदेवाड, भास्कर केंद्रे,पांडुरंग नागरगोजे, श्याम गीते, रामकिसन चंदेवाड, चंद्रकांत शिंदे, सूर्यप्रकाश जायभाये,सचिन केंद्रे सचिन साबळे आदींनी उपस्थित राहून आभिवादन केले.

About The Author

error: Content is protected !!