महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संदीप गुरमे व डॉ.राजकुमार पडीले यांचा सत्कार

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संदीप गुरमे व डॉ.राजकुमार पडीले यांचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दोन वेळा आयर्न मॅन पुरस्कार मिळाल्याबद्दल संदीप गुरमे व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ.राजकुमार पडिले याची पशुसंवर्धन उपआयुक्त पदोन्नती झाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके यांच्या हस्ते शाल ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सदस्य प्रा.मनोहर पटवारी, सुभाष धनुरे, ॲड.रजनी गुरमे, प्रा. पी.पी. पदातुरे प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना गुरमे म्हणाले महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर आपल्याला सराव करण्याची संधी मिळाल्यामुळे पुढील आयुष्यात अनेक स्पर्धा जिंकता आल्या, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकता, समय सुचकता, वेळेचे नियोजन, सकारात्मकता, समर्पण ठेवल्यास यश मिळते. ही खूणगाठ मनाशी बाळगावी, असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.मल्लेश झुंगा स्वामी यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!