प्रा.बालाजी होकरणे यांची उत्कृष्ट एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी म्हणून निवड

प्रा.बालाजी होकरणे यांची उत्कृष्ट एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी म्हणून निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यक्रमाधिकारी तथा वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.बालाजी होकारणे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षासाठी उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून निवड केली आहे. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अ‍ॅड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अ‍ॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author