सांप्रदायिक सद्भावना हेच भारताचे सामर्थ्य : एस. आय. ओ. ची राज्यव्यापी मोहिमेला सुरुवात
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय समाज बहुसांस्कृतिक समाज आहे. यामध्ये विविध धर्म आणि विचारांचे लोक, विविध जाती समूहाची संबंधित व्यक्ती, विविध संप्रदाय व जमाती, विविध भाषा बोलणारे आणि विविध संस्कृतींना मानणारे लोक अनेक शतकांपासून शांततापुर्वक एकत्र राहत आले आहेत. धर्म, संस्कृती, भाषा व परंपरेमध्ये परस्पर भिन्नता असताना सुद्धा आपसात मिळून मिसळून राहतात. पण सध्या आपला देश अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे.सांप्रदायिक संघर्ष, हिंसा, असहिष्णुता, भडकावूवृत्ती,अविश्वास, गैरसमज आणि आरोप प्रत्यारोपामुळे शतकानू शतकांचे नाते अपमानित होत आहे. तसेच सामाजिक बंध प्रभावित होण्याचा संशय निर्माण होत आहे. देशवासियांदरम्यान सध्या असलेले आपसातील प्रेम, बंधुभाव,शांती आणि मानवता यासारख्या मूल्यांचा ऱ्हास होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. असं वाटतं की नियोजनबद्द रीतीने लोकांची बूद्धी भ्रष्ट केली जात आहे, आणि पूर्ण समाजाला एका विशिष्ट दिशेला वळविण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या रेशीम बंधानी शतकांपासून परस्परांना जोडून ठेवले होते, त्या सामाजिक ऐक्याला उखडून फेकणे हाच सांप्रदायिक शक्तीचा मूळ उद्देश आहे. या परिस्थितीत आनंदाची बाजू ही आहे की, देशात आज सुद्धा शांतताप्रिय व न्यायप्रिय व्यक्ती मोठ्या संख्येत आहेत.ते या परिस्थितीमुळे चिंतित झाले आहेत. या परिस्थित सुधार करण्याच्या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये “आपण कुठे जात आहोत ?” या शीर्षकाखाली अभियान राबविले जात आहे. एस. आय. ओ. शहर उदगीर तर्फे रघुकुल मंगल कार्यालय येथे “आम्ही कुठे जात आहोत?” या मोहिमेचे उद्घाटन केले, ज्यात सोहेल अमीर,मुफ्ती नजमुद्दीन, अब्दुल रहीम, जुबेर अहमद,परमेश्वर कदम तसेच शहरातील विविध पक्ष व संघटनांचे लोक उपस्थित होते. देशातील जनतेला सांप्रदायिकतेच्या संकटापासून वेळीच सावध करण्याचे काम करण्यात आले पाहिजे.जे लोक समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करण्याचे कृत्य करीत आहेत, ते केवळ एका विशिष्ट समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे शत्रू आहेत. सांप्रदायिक सद्भाव प्रस्थापित करण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण गरज आहे, ती म्हणजे सर्वधर्मीय लोक आणि इतर सांस्कृतिक संघटनांच्या दरम्यान प्रत्येक स्तरावर सतत चर्चा घडवून आणण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे. ही व्यवस्था इतकी परिपूर्ण असली पाहिजे की, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया, व्हाट्सअप, आणि चिताणीखोर भाषणांच्या माध्यमातून प्रसारित होणारी चुकीची माहिती व अफ़वाची ताबडतोब छाननी झाली पाहिजे. ती प्रसारित होता कामा नये. या अभियानात मोठया प्रमाणात शाळेमध्ये,कॉलेजमध्ये लेक्चर घेण्यात येणार आहेत,याच बरोबर, नांदेड, पुणे, सोलापूर, कोल्हापूर औरंगाबाद येथील विद्यापीठात सेमिनार चे आयोजन करण्यात येणार आहे,युवकांशी मोठया प्रमाणात भेटी गाठी, सोशल मीडिया कॅम्पिअन,कॉर्नर मिटिंग, टी पार्टी यांच्या माध्यमातून 50 लाख लोकांपर्यंत हा संदेश पोहचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.यावेळी एस. आय. वो. चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.