अहमदपूर विद्यालयाच्या पर्यवेक्षक पदी राम तत्तापुरे यांची निवड

अहमदपूर विद्यालयाच्या पर्यवेक्षक पदी राम तत्तापुरे यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या यशवंत विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती निर्मला पंचगल्ले या सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्या रिक्त जागेवर उपक्रमशील शिक्षक तथा पत्रकार श्री रामलिंग बापुराव तत्तापुरे यांची रिक्त असलेल्या जागेवर सहशिक्षकावरून पर्यवेक्षक पदी पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर प्रार्थनेमध्ये त्यांचा प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल त्यांचे टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर,सचिव शिक्षण महर्षी डि बी लोहारे गुरूजी, उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र पैके, सहसचिव डॉ. सुनिताताई चवळे, उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेदेवाड, सोमनाथ स्वामी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!