अहमदपूर शहरात ‘गाथा मुक्ती संग्रामाची’ या ऐतिहासिक नाटककाचे आयोजन

अहमदपूर शहरात 'गाथा मुक्ती संग्रामाची' या ऐतिहासिक नाटककाचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील संस्कृती मंगल कार्यालयात दि.7 आँक्टोबर रोजी सायंकाळी ठिक ६:३० वाजता गाथा मुक्ती संग्रामाची या दोन अंकी नाटकाचे आयोजन सांस्कृतिक संचालनालय व सूर्योदय सांस्कृतिक कला मंच च्या वतीने आयोजित करण्यात आले असुन या नाटकाचा आस्वाद घेण्याची संधी अहमदपूर येथील कलारसिक प्रेक्षकांनी मिळणार आहे. तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, तहसिलदार शिवाजी पालेपाड, उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर,मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, गटविकास अधिकारी आंदेलकर , पोलिस निरीक्षक सुधाकर देडे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे आदिनी हे नाटक पहाण्यासाठी आवाहान केले आहे. संयोजन समितीचे सदस्य पुरुषोत्तम माने,रुषी पेंढारकर, रामलिंग तत्तापुरे,तुकाराम पाटील,महादेव खळुरे,बस्वराज थोटे, विष्णू डांगे,कामाक्षी पवार,अर्चना भंडे, कपिल बिरादार,चंद्रकांत पेड,मोहन तेलंग,शरद काकडे यांच्याकडे कार्यक्रमाच्या प्रेक्षक वर्गाचे नियोजन दिले आहे. कार्यक्रम स्थळी प्रथम येणाऱ्यास प्रथम आसन व्यवस्था करण्यात आली असून सर्वांनी वेळेवर उपस्थित रहाण्याचा आग्रह केला आहे.

About The Author