‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमा अंतर्गत कावळवाडी, गुट्टेवाडी येथे भाजपच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करण्यात आला

'होऊ द्या चर्चा' कार्यक्रमा अंतर्गत कावळवाडी, गुट्टेवाडी येथे भाजपच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करण्यात आला

अहमदपुर (गोविंद काळे) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज श्रीक्षेत्र कावळवाडी, गुट्टेवाडी येथे ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमा अंतर्गत भाजपच्या विविध योजनांचा भांडाफोड करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वाडी तांड्यावर भेट देऊन भाजपच्या विविध बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करण्यात येत आहे. आज श्रीक्षेत्र कावळवाडी, गुट्टेवाडी येथे भाजपच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रात स्मारक झाले का? १०० दिवसात काळे धन परत आले का? स्मार्ट शिटी झाली का? पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी झाले का? बुलेट ट्रेन धावली का? दोन कोटी नौकऱ्या मिळाल्या का? अशा विविध फसव्या योजनांचा पाढाच वाचण्यात आला. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कार्यवाही का करण्यात आली, पंकजा ताईंचा पराभव का झाला यासह असंख्य प्रश्नावर चर्चा करण्यात आली. जनतेने या सर्व योजनांचा भांडाफोड करताना होऊ द्या चर्चा कार्यक्रमास उदंड प्रतिसाद दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची जाणीव ठेवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा झाले पाहिजेत अशी भावना मुकुंद महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन व्यक्त करण्यात आली. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, पप्पू येवंदगे, पवन देऊळगावकर, मारोती बिराडे, दत्ता कदम, विजय ढाकणे, माधव बिराडे, सोपान कोंडमगिरे,शंकर मलिले,रामेश्वर ढाकणे, रामचंद्र गुट्टे,दयानंद गुट्टे, अर्जुन गुट्टे,संगिताआई गुट्टे, सगुणाबाई गुट्टे, विक्रम महाराज गुट्टे,माजी सैनिक गोविंद गुट्टे,ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक, महिलांची उपस्थिती होती.

About The Author