जरांगे पाटील यांच्या सभेसाठी समाज बांधवांनी कुटुंबासहित निघावे

जरांगे पाटील यांच्या सभेसाठी समाज बांधवांनी कुटुंबासहित निघावे

अहमदपूर (गोविंद काळे) : आरक्षण योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या दि 14 ऑक्टोबर ला अंतरवेली सराठी येथे होणाऱ्या सभेसाठी सकल मराठा समाज बांधवांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह सहभागी व्हावे असे आवाहन समन्वय समिती अहमदपूर यांच्यावतीने करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक उपोषण स्थळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिनांक 14 तारखेला अंतरवेली सराटी येथे होणाऱ्या आरक्षण योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या अति विराट जाहीर सभेसाठी नियोजनबद्ध तयारी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 119 वाहनांची नोंद केली असून यामध्ये बस,टेम्पो, कृजर,जीप,ट्रक अश्या वाहनांचा सहभाग आहे. वैयक्तिक वाहनांची संख्या अमर्याद असून त्यांनी ही नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील किमान 15 ते 20 हजार समाज बांधवांची नोंद झाली असून अजून बराच समाज निघणे अपेक्षित आहे सर्व प्रकारची खाजगी प्रवासी वाहनांची बुकिंग फुल्ल झाली असून वैयक्तिक वाहनांची संख्या निश्चित सांगता येणार नाही तेंव्हा सर्वांनी नोंदणी करावी जेणेकरून नियोजन व्यवस्था करण्यात येईल असे आवाहन करण्यात आली. संयोजन समितीच्या वतीने प्रत्येक गाडीसाठी स्टिकर, ध्वज,टोप्या असे साहित्य वितरण करण्यात येणार आहे. महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे त्यांच्या सुरक्षेसाठी समाज बांधव कटिबद्ध आहेत असे समनव्यय समितीच्या वतीने सांगण्यात आले. दि 14 तारखेला सर्व सकल मराठा समाज बांधव सभेसाठी जाणार असल्याने या दिवशी साखळी उपोषणाचा किल्ला दलित समाज बांधवांतर्फे लढला जाणार आहे तर मुस्लिम समाज बांधव 14 तारखेला अल्पोपहार वाटप करून 15 तारखेला साखळी उपोषण करणार आहे.तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या सभेसाठी निघावं व तालुकास्तरावर नोंदणी करावी असे आवाहन समनव्यय समिती ,अहमदपूर तालुका यांच्या वतीने करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!