लातुर येथे ७ दिवशीय पाली भाषा मार्गदर्शन वर्ग

लातूर (प्रतिनिधी) : अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या देशाची बोलीभाषा असलेली प्राचीन भाषा पालीचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी जानेवारी २०२१ मध्ये लातुरात सात दिवशीय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहे, इच्छुकांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक भन्ते पय्यानंद यांनी केले आहे.

२५०० वर्षापुर्वी संपुर्ण उत्तर भारतात पाली भाषा ही लोकभाषा होती.एवढेच नसुन पाली भाषा एक प्राचीन वारसा व पवित्र वचन ठरली आहे.कारण शांतीचे अग्रदुत तथागत भगवान बुध्दांनी या पाली भाषेतुन संपुर्ण धम्माची शिकवण दिली आहे.संपुर्ण त्रिपिटक बौध्द साहित्य या भाषेत लिपिबध्द आहे.तेव्हा पाली भाषा ही बौध्दांची मुळ भाषा आहे.आहे.सर्व तत्वज्ञान आचार विचार संस्कृती ऐतहासिक पाऊल खुणा हे सर्व पालीभाषेतच पहावयास आपणास मिळते .१२०० वर्षापर्यंत पाली भाषा माणसात रुळलेली होती.कालांतराने पाली भाषा लोप पावली आहे.तेव्हा लातुर जिल्हयातील बौध्द समाजातीर सर्वांना बौध्द साहित्य समजुन घेण्यासाठी पाली भाषेची प्राथमिक स्वरुपात ओळख होणे महत्त्वाचे आहे.सध्या स्थितीत आपणास पालीविषयी अज्ञान आहे.तेव्हा पाली भाषेचे मार्गदर्शन करुन घेण्यासाठी जानेवारीमध्ये सात दिवशीय पाली भाषेचे मार्गदर्शन वर्ग तथा शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.तरी पाली भाषा अध्ययन करु इच्छिणाऱ्यांनी नाव नोंदणी करुन आपला प्रवेश निश्चित करून पाली भाषेचे ज्ञान अवगत करावे, शिबिरात सहभागी होण्यासाठी पुर्व नाव नोंदणी व ठराविक स्वरूपात शुल्क असणार आहे, असे आवाहन संयोजक भिक्खु पय्यानंद यांनी केले आहे.

About The Author