स्मशानभुमीमध्ये फुलवली बाग

स्मशानभुमीमध्ये फुलवली बाग

ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम

लातूर (प्रतिनिधी) : खाडगाव स्मशानभुमीमध्ये ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम व सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मरण यातनेनंतरचा प्रवास सुखकर व्हावा या दॄष्टीने मागील काही दिवसपासून स्मशानभुमीची स्वच्छता केल्यानंतर आज ग्रीन लातूर टीमच्या वतीने
अंत्ययात्रेकरीता स्मशान भूमीत आलेल्या लोकांना बसण्याकरीता २६ सिमेंटचे बाकडे बसविण्यात आले. तसेच १०० शोभीवंत झाडांच्या कुंड्या रंगबिरंगी फुलांची ७०० रोपे लावण्यात आली. १० फुट उंच कडुनिंबाची ५० झाडे, ५ मोठ्या कचरा कुंडी, स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याकरीता १०० पाट्या ठिकठिकाणी लावण्यात आल्या. झाडांना २ टॅकरद्वारे पाणी देण्यात आले. हे सर्व कार्य लोकसहभागातून झाले. याकरीता अभिनव शहा, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. नारायण नागमोडे, मनोज कोल्हे, डॉ. भास्कर बोरगावकर, धीरज तिवारी, डॉ. शैलेश पडगीलवार, डॉ. मंजुषा कुलकर्णी, वैशाली पाटील, किरण माने, ॲड. राजेंद्र काळे यांनी सहकार्य केले.

हा उपक्रम यशस्वी करण्याकरीता ग्रीन लातूर वृक्ष टीमचे समन्वयक डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रानजी सय्यद, गंगाधर पवार, ॲड. वैशाली यादव-लोंढे, रुषीकेश दरेकर, शिवशंकर सुफलकर, विशाल टेकाडे, महेश गेलडा, सिताराम कंजे, सुलेखा कारेपुरकर, युगा कनामे, निकिता कावळे, कल्पना फरकांडे, डी.एम. पाटील, गोविंद शिंदे, प्रमोद निपानीकर, प्रसाद शिंदे, डॉ. जयंत पाटील, सुहास पाटील, सुरज पाटील, प्रमोद वरपे, कृष्णा वंजारे, महेश भोकरे, विजयकुमार कठारे, तोसिफ सय्यद, मुकेश लाटे, आशा आयचित, अभिजित चिल्लरगे, पुजा निचळे, डॉ. शैलेश पडगीलवार, डॉ. अमृत पत्की, मोईझ मिर्झा, ॲड. सर्फराज पठाण, बाळासाहेब बावणे, नागसेन कांबळे, कुंदन सरवदे, बालाजी उमरदांड, कपील काळे, नितीन पांचाळ, बळीराम दगडे, शुभम आवाड यांनी परिश्रम घेतले.

About The Author